वृत्तसंस्था/ गुडालजेरा (मेक्सिको)
ग्रीसच्या द्वितीय मानांकित सॅकेरीने येथे झालेल्या डब्ल्युटीए टूरवरील गुडालजेरा महिलांच्या 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळवताना कॅरोलिनी डुलेहिडेचा पराभव केला.
ग्रीसच्या नवव्या मानांकित सॅकेरीने डुलेहिडेवर 7-5, 6-3 अशी मात करत विजेतेपद पटकावले. सॅकेरीच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील डब्ल्यूटीए टूरवरील हे दुसरे विजेतेपद असून गेली चार वर्षे तिला एकही स्पर्धा जिंकता आली नव्हती. गेल्या वर्षी या स्पर्धेत अंतिम फेरीत सॅकेरीला अमेरिकेच्या पेगुलाकडून पराभव पत्करावा लागला होता.









