प्रतिनिधी /मडगाव
आमदार दिगंबर कामत यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता मडगावात काँग्रेस पक्षाच्या विविध समित्यांवरील अध्यक्ष व अन्य पदाधिकारी सुद्धा राजीनामा देण्याच्या पवित्र्यात आहेत. नुकताच मडगाव महिला काँग्रेस गट समितीच्या अध्यक्षा प्रतिमा बांदेकर यांनी आपल्या पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा काँग्रेस समितीकडे बांदेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मडगावात आता काँग्रेसची गोची झाली आहे. कामत यांच्या पाठोपाठ त्यांचे समर्थकही भाजपवासी होऊ लागले आहेत. बांदेकर या दिगंबर कामत यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात.









