रस्त्यावर भरविले प्रतिसभागृह
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेश विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी समाजवादी पक्षाने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयापासून विधिमंडळापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. हा मोर्चा रोखण्यात आल्याने अखिलेश यादव यांच्यासह पक्षाच्या आमदारांनी रस्त्यांवर ठिय्या मांडून प्रतिसभागृह भरविले आहे. अखिलेश यादव यांनी पक्षाच्या आमदारांसोबत रस्त्यांवर धरणे आंदोलन केले आहे. उत्तरप्रदेशात काही भागांमध्ये पूर तर काही भागांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. राज्य सरकारने शेतकऱयांना या नुकसानीप्रकरणी कुठलाच दिलासा दिलेला नाही. सरकारमुळे सातत्याने महागाई वाढत आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था कोलमडली असून भ्रष्टाचाराने कळस गाठल्याचा दावा अखिलेश यांनी केला आहे.









