निपाणी/प्रतिनिधी:मराठा समाजातर्फे आरक्षणासाठी शांतता आणि सनदसीर मार्गाने आंदोलन, मोर्चे काढले जात आहेत. तरीही पोलीस प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यावर हल्ले केले जात आहेत. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचा शांततेने मोर्चा सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठी हल्ला केला. त्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारी सकाळी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी मराठा समाजबांधवांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित रहावे. तेथून शांततेने मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयावर जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.
Previous Articleजुन्या मनपा परिसराची अखेर स्वच्छता
Next Article मनपाच्यावतीने विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण









