साताऱ्यात राजपथावर संविधान बचावासाठी दलित संघटनांचा एल्गार
सातारा : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश भूषण गवई यांनी भगवान विष्णूंबाबत वक्तव्य करताच वकील राकेश किशोर याने त्यांच्या दिशेने बुट फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्या घटनेच्या निषेधार्थ साताऱ्यात दलित संघटनांनी संविधान संघर्ष मोर्चा काढून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाले. अनेकांनी आपली मते मांडली. साताऱ्यात दलित संघटनांनी काढलेल्या मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून होवून हा मोर्चा पुढे राजपथ मार्गे, पोलीस मुख्यालय, शिवतीर्थ, जिल्हाधिकारी कार्यालय असा पोहचला.
या मोर्चात गणेश भिसे, अशोक गायकवाड, अमोल आवळे, प्रा. अरुण गाडे, दादासाहेब ओव्हळ, चंद्रकांत खंडाईत, रमेश उबाळे, कामेश कांबळे, पिंटू गायकवाड, मधुकर आठवले, सत्यवान कमाने, सादिक शेख, उमेश खंडझोडे, विजय गायकवाड, के. एस. कांबळे, गणेश कारंडे, सुधाकर काकडे, अरुण पोळ, वैभव गायकवाड, योगेश धोत्रे, जीवन लिंबारे, किरण बगाडे, सिद्धार्थ कांबळे, अमोल गंगावणे, संदीप कांबळे, उमेश चव्हाण, अरुण पवार,
ओबीसी नेते भरत लोकरे, प्रकाश फरांदे, संदीप जाधव, भाऊसाहेब वाघ, किशोर धुमाळ, अरुण जावळे यांच्यासह मान्यवर कार्यकर्त्यांचे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देवून निषेध नोंदवला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर अनेकांनी आपली मते प्रखरपणे मांडली. मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.








