वृत्तसंस्था / बेंगळूर
27 एप्रिल रोजी येथे होणाऱ्या टीसीएस विश्व 10 कि.मी. पल्ल्याच्या मॅरेथॉनमध्ये युगांडा आणि केनियाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे धावपटू सहभागी होणार आहेत.
सदर मॅरेथॉन पुरुष आणि महिला अशा दोन गटामध्ये घेतली जाणार असून पुरुष विभागात 2014 नंतर प्रथमच युगांडाच्या ऑलिम्पियन विजेत्या जोशुआ चेपतेगीचे पुनरागमन होणार आहे. युगांडाचा चेपतेगीचा सहकारी स्टिफन किसा हा प्रमुख प्रतिस्पर्धी राहिल. 2020 च्या दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये स्टिफन किसाने कांस्य पदक मिळविले होते. या बेंगळूर मॅरेथॉनमध्ये केनियाचे सिनटिया चिपेनगेनो, ग्लेडीस माँगरे यांचाही सहभाग राहिल. महिलांच्या विभागात चिपेनगेनो माँगरी तसेच अॅसमेरेच अॅनेली, युगांडाची सारा चिनेलगेटकडून केनियाच्या धावपटूंना कडवा प्रतिसाद होऊ शकेल.









