प्रतिनिधी / बेळगाव : मागील आठवड्यात होसूर् येथे संपन्न झालेल्या केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत मराठी विद्या मंदीर किटवाड शाळा अव्वल ठरली आहे. सलग ४ थ्या वेळा जनरल चॅम्पियनशिप किटवाडने राखून ठेवले आहे.
आज दाटे येथे झालेल्या स्पर्धेत मराठी विद्या मंदिर किटवाड शाळेने कब्बडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. दाटे येथे शालेय कब्बडी स्पर्धेत मोठ्या गटात मराठी विद्या मंदीर किट वाड पुन्हा चौथ्यांदा प्रथम आला. केंद्र स्तरावरील सर्व प्रथम संघात येथे सामना रंगला. यामधे तिसरा क्रमांक कार्वे मराठी शाळा, दुसरा बागीलगे शाळा तर प्रथम किटवाड मराठी शाळेने पटकाविला आहे.
या विजेत्या संघाला मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक अष्टेकर, सागर पाटील, सर्व शिक्षक स्टॉप तसेच सतीश नरेवाडकर,सिद्राम मोदगेकर आणि ब्रह्म लिंग
संघाने केले.
यामध्ये अमन खंदाळकर,सचिन नरेवाडकर,महेश पाटील, प्रतिक रावजीचे,ज्ञानेश्वर पाटील, मानव पाटील,ओमकार जाधव,श्रेयस लाड,श्रेयस पाटील,अवधूत,विनायक मोदगेकर,महादेव आदी खेळाडूंचा सहभाग होता.









