कोल्हापूर :
काल सकल मराठा समाजाने शिवाजी पुतळ्यासमोर आरक्षणासंदर्भात सरकारने मराठा समाजाला फसवलं असा आरोप करून निषेध व्यक्त केला. तसेच आरक्षण संदर्भात कोणत्याच हालचाली न केल्यास राजकिय नेत्यांना विशेषता पालकमंत्र्यांना फिरू दिले जाणार नाही असा ईशारा काल सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर त्यानंतर आज लगेच आक्रमक होत आंदोलकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घेराव घालून कोल्हापूरात येण्यास मज्जाव घातला. तसेच सरकार विरोधी घोषणा दिल्या गेल्या. आंदोलकांनी अचानक केलेल्या या घेरावाने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली.
मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर शिंदे- फडणवीस सरकारने 15 दिवसांची मुदत मागीतली असताना जरांगे पाटलांनी त्यांना 40 दिवसांची मुदत दिली. या 40 दिवसाता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोणत्याच हालचाली केल्या नाहीत. दसऱ्याच्या सिमोल्लंघन दिवशी 40 दिवस संपल्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा आपले उपोषणाचे हत्यार उपसले. त्यानंतर राज्यभरातील अनेक गावामध्य़े सर्वपक्षीय राजकिय नेत्यांना मराठा समाजाकडून गावबंदी करण्यात येत आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणावरुन कोल्हापूरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. शिवाजी पुतळ्याजवळ जमून मराठा समाजाने सरकारविरोधी घोषणा देऊन निषेध करण्यात आला. या आंदोलनातच काल सरकारने मराठा समाजाला फसवले आहे. त्यामुळे जर आरक्षणासंदर्भात कोणत्याच हालचाली केली नाही तर राजकिय नेत्यांनी कोल्हापूरात गावबंदी करण्यात येईल असे सांगून विशेषता कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरात फिरकू न देण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, आज मुंबईवरून पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूरला परतले. आज सकाळी लवकर सकल मराठा समाजाने त्यांना रेल्वे स्थानकावरच गाठून त्यांना अडवले. दिल्लीत बसलेल्या मोठ्या नेत्यांना मराठा समाजाबद्दल राग असल्यानेच अद्याप निर्णय घेतला नाही असा आरोप सकल मराठा समाजाने मुश्रीफ यांना केला. हसन मुश्रीफ यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी राज्य सरकारसोबत ताबडतोब चर्चा करावी. अन्यथा कोल्हापूरात न येता कागलमधून कारभार करावा असे आव्हानही त्यांना देण्यात आले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकार कटीबद्ध असून आरक्षण आम्हीच देणार असा विश्वास व्यक्त केला. अचानक घातलेल्या या घेराव्यामुळे पोलीसांसह प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.









