के. आर. शेट्टी निमंत्रितांची क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के. आर. शेट्टी निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून मराठा स्पोर्ट्स संघाने साईराज अ चा 70 धावांनी, एसआरएस हिंदुस्थानने पांडुरंग सीसीचा 8 गड्यांनी तर प्रथमेश मोरे संघाने गंगावती एमएसडी संघाचा 4 गड्यांनी पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. शाहीद, सुर्या व गणेश कोप्पद यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावरती खेळविण्यात आलेल्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 2 गडी बाद 131 धावा केल्या. त्यात गणेश कोप्पळने 5 षटकार 5 चौकारांसह 69, मकवानने 22 धावा केल्या. साईराजतर्फे अक्षय व सिद्धार्थ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साईराजने 8 षटकात 5 गडी बाद 61 धावा केल्या. त्यात सुजितने 3 षटकार 1 चौकारांसह 32 तर सिद्धार्थने 10 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्सतर्फे अनुपने 2 तर इलुने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात पांडुरंग सीसीने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 70 धावा केल्या. त्यात योगेश व बबलु यांनी प्रत्येकी 3 चौकारांसह 17 धावा केल्या. एसआरएसतर्फे सुर्याने 9 धावांत 3 तर जतिनने 20 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसआरएस हिंदुस्थानने 5.1 षटकात 2 गडी बाद 74 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात प्रतिकने 1 षटकार 5 चौकारांसह 38, देवदत्तने 2 षटकार 2 चौकारांसह 24 धावा केल्या. पांडुरंग सीसीतर्फे विजयने 2 गडी बाद केले.
तिसऱ्या सामन्यात गंगावती एमएसडीने 8 षटकात 6 गडी बाद 82 धावा केल्या. त्यात अशोक मेंडीसने 2 षटकार 2 चौकारांसह 23, विजयकुमारने 17 धावा केल्या. प्रथमेश मोरेतर्फे फिरोजने 2 तर ऋत्विकने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना 5.1 षटकात 6 गडी बाद 85 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात शाहीदने 3 षटकार 3 चौकारासह 33, नागाने 3 षटकारासह 21 धावा केल्या. गंगावतीतर्फे मनोज, तापाश यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाटील आर. एम. चौगुले, शेखर दाणवेकर, मिलिंद बेळगावकर, प्रणय शेट्टी व इतर मान्यवरांच्या हस्ते सामनावीर व इम्पॅक्ट खेळाडूंना गौरविण्यात आले. शनिवारी अंतिम सामना दुपारी खेळविण्यात येणार असून बक्षीस वितरण प्रसंगी महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर, विठ्ठल हेगडे, राहुल जारकीहोळी, सर्वोत्तम जारकीहोळी, आर. एम. चौगुले, रमाकांत कोंडुसकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शनिवारचे सामने
- नील बॉईज हिंडलगा वि. मराठा स्पोर्ट्स सकाळी 9 वाजता
- एसआरएस हिंदुस्थान वि. प्रथमेश मोरे सकाळी 12 वाजता









