मणेराजूरी,वार्ताहर
Jalna Lathi Charge : जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या भीषण लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मणेराजूरीत सोमवारी कडकडीत बंद पाळला. याला व्यापाऱ्यासह ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला.नेहमी गजबलेला बसस्थानक चौकात या बंदमुळे सन्नाटा होता.
या बंदला मणेराजूरी गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सोमवारी दिवसभर व्यापारी वर्गाने व्यवहार कडकडीत बंद ठेवून पाठिंबा दिला.याचबरोबर गावातीत सर्व समाजाने या बंदला मोठा पाठिंबा दिला.गावातील बँका,शाळा,पतसंस्था या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.यामुळे एसटी सेवा विस्कळित झाली.अंतरवाली सराटी येथे मराठा समाजावरील हल्याच्या निषेधार्थ सोमवारी मणेराजूरी बंदची हाक मराठा सकल समाज व राष्ट्रवादीने दिली होती.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सहा दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्यासह काही मराठा समाजातील तरुणांचे उपोषण सुरू आहे.१ सप्टेंबर रोजी आंदोलनातील सहभागी आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला होता.याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले.अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.
यावेळी बसस्थानक चौकातील महावीर पांडूरंग साळुंखे यांच्या पुतळयासमोर मराठा समाजासह राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी,कार्यकर्त्यांनी जालना घटनेचा निषेध व्यक्त केला.यावेळी घोषणा देवून निषेध केला. जि.प. सदस्य सतीश पवार,बाजार समितीचे संचालक खंडू पवार,पंचायत समितीचे संजय जमदाडे,युवा नेते दामू पवार,अरूण पवार, उपसरपंच बाळासो पवार,दादासो पवार,अमोल वाघमारे,शेरोद्दीन मुजावर, सोसायटीचे चेअरमन बाळासो जमदाडे,बबन लांडगे अशोक पवार,विनायक पाटील लिंब याच्यासह मराठा समाजाचे युवक व ग्रामस्थ उपस्थित








