Jalna Lathi Charge : जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरात जाहीर निषेध मोर्चा काढण्यात येत आहे. सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने काल बंदची हाक दिली होती. त्य़ानुसार आज सकाळपासूनच साताऱ्यात व्यापारी आणि दुकानदारांनी व्यवहार बंद ठेवेले आहेत. तर कोल्हापुरातून सातारा-पुणे-मुंबईसाठी जाणाऱ्या एसटी बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामुळे प्रवासांचे होल होत आहेत.
Previous Article‘मर्दानी 3’मध्ये झळकणार राणी
Next Article धाराशिवमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार









