खानापूर : तालुकास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयाच्या तालुका मर्यादित क्रीडास्पर्धेत मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी घवघवीत यश संपदान केले.
मुलांचा विभाग :
व्हॉलीबॉल सुवर्ण,तसेच वैयक्तिक खेळात आदित्य पानेरी गोळाफेक सुवर्ण, प्रथमेश देसाई बुध्दीबळ सुवर्ण, मंथन खांबले 1500 मि.धावणे व क्रॉस कंट्री रौप्य, सोहम केशकामत गोळाफेक कांस्य, परशराम डावरी यांने उंच उडीमध्ये कांस्य.
मुलींचा विभाग :
वैयक्तिक खेळात बाळाताई मेंडीलकर सुवर्ण व सुहानी पाटील बुद्धिबळ सुवर्ण, विद्या गोडसे वाँक सुवर्ण, वैष्णवी गुरव डिस्कस थ्रो रौप्य,सांघिक खेळ कबड्डी द्वितीय क्रमांक, थ्रो बॉल द्वितीय क्रमांक मिळविला आहे. या सर्व खेळाडूना विद्यार्थी, विद्यार्थिनी खेळाडूंचे मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डा. राजश्री नागराजू यांनी विशेष कौतुक केले.









