प्रतिनिधी /बेळगाव
मराठा मंडळ इंग्रजी माध्यम हायस्कूलच्या 95-96 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्यमहोत्सवी मेळावा रविवारी उत्साहात पार पडला.
प्रारंभी दिवंगत शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक डेझी फर्नांडिस, विकी पाटणेकर, शिंदे, मारिया, सावंत, प्रभा इनामदार, अरुण पाटील, सावनूर, शिंत्रे यांचा तसेच शाळेतील साहाय्यक लक्ष्मी मावशी, शिपाई शिवाजी मामा याचा सत्कार केला.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंमुळेच आपण यशाच्या टप्प्यावर आहोत, असे सांगून कृतज्ञता व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल शिक्षकांनीही समाधान व्यक्त करून आपल्या मुलांना उच्चशिक्षण देऊन सुजाण नागरिक बनवा, अशा शुभेच्छा दिल्या.









