Ajit Pawar News : मराठा आरक्षणासंदर्भात काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल बैठक पार पडली.या बैठकिला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. मात्र यावेळी सकल मराठा समाजाच्या बैठकीत योगेश केदार यांना निमंत्रण दिले नसल्याने काहीकाळ सभेत गोंधळ झाला.यावेळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान अजित पवार यांनी मराठा समाजाचे नागरिक यांनी भेट घेतली. काही गोंधळ झाला, पण मी आधी कोल्हापूरच्या समाजाशी आणि नंतर बाहेरून आलेल्या मराठा समाजाशी बोललो असल्याचे माध्यमांना स्पष्ट केले.सकल मराठा समाज, कोल्हापूर शहर व जिल्हा कृती समितीने अजित पवार यांची भेटण्यासाठी वेळ मागितली होती.
मराठा समाजाच्या नागरिकांशी आता समजून घेतलं आहे.मराठा समाजाच्या बाबतीत आम्ही घेतलेला निर्णय हायकोर्टात टिकला नाही.देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टात टिकला नाही. पण मराठा समाजाला मदत होईल याबाबत अनेक निर्णय घेतले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहणासाठी मला कोल्हापूर जिल्हा दिला.कामाची परिस्थिती,पाण्याची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.अनेक स्वातंत्र्यसैनिकांशी भेटलो.कळम्मावाडी धरणाची गळती एका वर्षात होईल असं शक्य नाही.ही गळती काढण्यासाठी 80 कोटी लागणार आहे.मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावणार. दरवर्षी पाणी कमी भरणे परवडणारे नाही.पाऊस कमी झाला आहे,काही पिकं देखील धोक्यात आहेत.ऊस पीक चांगले राहील असं काही नागरिकांचे म्हणणे आहे.कारखाने कधी सुरू करायचे याबाबत निर्णय घेतले जाईल असेही ते म्हणाले.
अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात भेट झाली. यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, पुण्याच्या बैठकीचं काही मनावर घेऊ नका.पवार साहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत.या बैठकीला राजकीय रंग देऊ नका.मी कुठेही लपून गेलो नाही.मी कधी लपून गेलो सांगा ना? चोरडिया यांचे आणि आमचे दोन पिढ्यांचे नाते आहे.चोरडिया यांनी पवार साहेबांना जेवायला बोलावले होते.जयंत पाटील देखील त्याठिकाणी पवार साहेब यांच्यासोबत होते.दोन पिढ्या ओळखीच्या व्यक्तीच्या घरी जाणे काय चुकीचे?असा सवाल अजित पवार यांनी केला. इथून पुढे कधीही आम्ही भेटलो तर ती कौटुंबिक भेट असेल.दिवाळीला भेटेन, दसऱ्याला भेटेन ती भेट कौटुंबिक असेल.भाजपने कुणाला ऑफर दिली तर तो त्यांचा प्रश्न आहे, असही अजित पवार म्हणाले.
नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामिन मंजूर झाला. यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, नवाब मलिक यांच्याशी काही बोलणं झालं नाही.आताच ते आरोग्याच्या मुद्द्यावरून बाहेर आले आहेत.त्यांच्याशी फोनवरून बोलता येत नाही.पण मी सध्या तुमच्या जवळ आहे मलिक यांना भेटलो नाही, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, कोल्हापूरची हद्दवाढ होणे गरजेचे आहे.काही नागरिक याला विरोध करत आहेत.मात्र शहराचा विकास करत असताना हद्दवाढ करणं ही गरजेच असल्याचे अजित पवार म्हणाले.








