प्रतिनिधी
बांदा
सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई संचालित, सावंतवाडी आणि कुडाळ समिती तर्फे आयोजित, वधू – वर परिचय मेळावा रविवार दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी, आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग तालुक्यातील, मराठा संवर्गातील, यंदा कर्तव्य असलेल्या युवक- युवतींसाठी ही सुवर्णसंधी आहे . तरी संबंधितांनी सदर मेळाव्यात सहभागी होऊन नोंदणी करावी. सदरचा मेळावा सावंतवाडी संस्थान मराठा समाज के. टी. व्ही. देसाई वस्तीगृह. शिरोडा नाका सावंतवाडी येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार असून भरत गावडे ९४०३०८७७९६ व मेघना राऊळ ९४२३२१९७८१ यांच्याशी संपर्क साधावा
Previous Articleगोवेरी येथील देव सत्पुरुष व देवी भराडी मंदिरात धार्मिक कार्यक्रम
Next Article न्हावेली येथे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन









