अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव येथे (दि. १५) रोजी पहाटे पाच वाजता एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलाला झोपेत मण्यार जातीचा साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला. महादेव स्वामीनाथ हत्तरके असे त्याचे नाव आहे. सापाने दंश केल्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र याठिकाणी उपचार होऊ शकले नाहीत.म्हणून पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण उपचारांपूर्वी त्या बालकाचा मृत्यू झाला.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा- Kolhapur : हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, निलजी बंधारे पाण्याखाली
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महादेव हत्तरके या बालकाला मध्यरात्री गाढ झोपेत असताना सापाने दंश केला होता. पहाटे त्याला त्रास होऊ लागला.यानंतर त्याच्या पायाला सापने दंश केल्याचा संबंधित प्रकार लक्षात येताच त्याच्या आई-वडिलांनी त्याला उपचारासाठी सुरुवातीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र याठिकाणी उपचार होऊ शकले नाहीत.म्हणून पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हत्तरके कुटुंबाची घरची परिस्थिती नाजूक असून मोलमजुरी करून हे कुटुंब उपजीविका करते. या चिमुकल्या बाळाच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ असे कुटुंब आहे. शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी असे ग्रामस्थांतून मागणी होत आहे.
Previous Articleऔरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारकडून स्थगिती
Next Article सांगली: GST विरोधात यार्डात उद्या व्यापार बंद









