Dhananjay Mahadik News : कोल्हापुरातील स्थगिती मिळालेल्या कामांना पुन्हा मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यातील विकासकामासाठी 78 कोटी 99 लाख रुपये मंजूर झाले आहेत. शहरातील 81 प्रभागामध्ये प्रलंबित विकासकामाची माहिती द्या ती तात्काळ मार्गी लावू असं आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिलं. 27 जूनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. धनंजय महाडिक यांच्या वक्ताव्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
भाजपाने देशातील सर्व तर राज्यातील 48 लोकसभा मतदार संघावार लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात उमेदवारी वाटपाचे काम अजून निश्चित नाही. मात्र, 45 जागा निवडून आणण्याचं ध्येय आहे. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राज्यातील अनेक दौऱ्यात मोठे पक्ष प्रवेश होईल. जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा जागा कोणाला मिळणार यावर अजून चर्चा नाही, पण ज्यावेळी मिळेल त्यावेळी सोबत काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे.

भाजपने आमचा योग्य सन्मान केला आहे त्यामुळे वरिष्ठ पातळी जो निर्णय देईल तो काम करणार त्यामुळे आम्हाला लोकसभेच्या उमेदवारीबाबत कोणती आशा नाही. आम्हाला विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार करायला सांगितलं तर करणार कारण आम्ही भाजपचे सैनिक आहोत, पक्ष जो आदेश देईल तो स्वीकारणार. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना वरिष्ठांच्या सूचनेनुसार भाजपमध्ये प्रवेश देऊन लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले तरी आम्ही त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करू असेही ते म्हणाले.








