विटा / सचिन भादुले :
विट्याची वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. त्यावर रिंग रोड, बायपास रस्ता, पार्किंग विकसीत करणे, एकेरी वाहतूक, सम-विषय पार्किंग असे अनेक उपाय आहेत, मात्र त्यासाठी राजकीय मंडळी, नगरपालिका आणि वाहतूक पोलीस शाखेने हातात हात घालून काम केले पाहिजे. शिवाय वाहनधारकांनी शिस्त पाळणे देखिल महत्त्वाचे आहे. अन्यथा वाढती लोकसंख्या, त्याबरोबर वाढणारी वाहने यामुळे ही समस्या अधिकच बिकट होत जाणार हे नक्की, याबाबत शहरातील प्रमुख राजकीय नेत्यांशी चर्चा केली असता त्यांनी देखिल हेच उपाय सुचवले. त्याची अंमलबजावणी कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- हे तर सत्ताधाऱ्यांचे अपयश
विटा शहराची वाढ पाहता लोकांना त्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र पाठीमागील सत्ताधाऱ्यांनी लोकांच्या सोयीऐवजी स्वतःची सोय अधिक पाहिली. वेळोवेळी रिंगरोड, वाहनतळासाठी आरक्षित असणाऱ्या जागा ताब्यात घेऊन आरक्षणे विकसीत करणे गरजेचे होते. मात्र तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाचा वापर लोकांना मिती वाखवण्यासाठी केला. वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी त्यांनी घेतली नाही. त्यामुळे आजची परिस्थिती ओढावली आहे. भविष्यात आम्ही जबाबदारी घेऊन काम करणार आहोत. आमच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. विट्यातील जनतेने सत्ता विल्यास निश्चितपणाने लोकांना अपेक्षीत विकास घडवून आणू. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी आ. सुहास बाबर यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बायपास रस्त्याची मागणी केली आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही करीत आहोत. शिवाय रिंग रोड आणि वाहनतळ विकासीत झाले पाहिजेत, यासाठीही भूमिका घेऊ.
– अमोल बाबर, माजी बिरोधी पक्ष नेते, संचालक जिल्हा बँक
- जबाबदारी झटकून चालणार नाही
शहराच्या वाहतुकीला शिस्त लावताना प्रशासनाने गांभीर्याने काम करणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या तीन वर्षात आम्ही अनेकवेळा सुचना करूनही त्याकडे सोयिस्कर वुर्लक्ष केले जाते. भाजी विक्रेते, वाहनांचे थांबे, रिक्षा स्टॉ पची मर्यावा याबाबत विचार झाला पाहिजे. मात्र प्रत्येक गोष्टीत राजकारण केले तर शहराला शिस्त लागणार नाही. आम्ही शहराकडे कुटूंब म्हणून पाहतो. त्यामुळे शिस्त लावण्यासाठी जे आवश्यक आहे, ते निर्णय कोणीही घ्या, पण लोकांची गैरसोय होता कामा नये, ही भूमिका आहे. शहरातील जुनी नगरपालिका, नविन नगरपालिका इमारतींच्या पुढे, पंचमुखी गणपती मागे असणाऱ्या जागांवर शिस्तीने पार्किंग केल्यास वाहतुकीस अडथळा होणार नाही. त्यासाठी प्रशासनाने पे अॅण्ड पार्क किंवा मनुष्यबळ उपलब्ध करून विले पाहिजे. पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाने हातात हात घालून काम केले तरच हे शक्य आहे. मात्र गेल्या काही वर्षात समन्वयाचा अभाव विसून येत आहे. शिवाय शहरातील अनेक नवीन रस्ते जसे की सांगली ते पारे रस्ता, भाळवणी रस्त्यावरून नवीन पुलावरून कुंडल रस्ता आणि तेथून ऐंशी फुटी रस्त्यावरून सांगली रस्ता, क्रीडा संकुलमार्गे नेवरी रस्ता आणि मनमंदिर दूध संघाकडून कराड रस्ता, असे रस्ते विकसीत झाले. प्रशासनाने त्याचा वापर करण्यासाठी लोकांना उद्युक्त केले पाहिजे. मायणी रस्ता टेलिफोन कार्यालय ते नेवरी रस्ता, रस्ता, साळशिंगे रस्ता ते पोवई टेक रस्ता, मॉडर्नच्या पाठीमागील डीपी रोड हे रस्ते थोड्यासाठी थांबले आहेत. त्याची कामे मार्गी लागल्यास वाहतुकीचा ताण कमी होईल. रिंग रोड तर विकासीत झालाच पाहिजे. मात्र तत्पूर्वी हे रस्ते खुले झाल्यास शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल. शिवाय सम-विषम पार्किंग, एकेरी वाहतूक आवी प्रयत्न पोलिस प्रशासनाने करायचे आहेत. त्यांनी जबाबवारी झटकून चालणार नाही.
– वैभव पाटील, माजी नगराध्यक्ष, विटा नगरपरिषद
- वाहतूक शाखेला मनुष्यबळ द्या
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक प्रशासन, वाहतूक पोलिसांनी गांभिर्याने प्रयत्न आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे. यापूर्वी नगरपरिषवेने वाहतूक शाखा, प्रशासन यांच्यासह कौन्सील सदस्यांच्या अनेक बैठका घेऊन काही एकविशा मार्गाची निश्चिती, सम विषम तारखांचे पार्किंग, नो पार्किंग झोन, पांढरे पट्टे आखणे, अडथळा होणाऱ्या आणि पांढऱ्या पट्ट्याबाहेर पार्क केलेल्या वाहनांवर जप्ती, वंडात्मक कारवाई करणे, रस्त्यालगतच्या वुकानांचे अतिक्रमण काढून घेणे, यासारख्या उपाययोजना केल्या होत्या. परंतु वाहतूक शाखेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अंमलबजावणी करण्यास असमर्थ असल्याचे वाहतूक शाखेने सांगितल्याने उपाययोजना कागवावरच राहिल्या. तीन वर्षांच्या प्रशासकिय कारकिर्दीत वाहतूक कोंडीचा प्रश्न अति गंभीर झाला आहे. महात्मा गांधी चौकातील अहिल्यादेवी होळकर शॉपिंग सेंटरच्या तळघरातील पार्किंगमध्ये गाड्या पार्क करण्याची सवय लावणे आवश्यक आहे. नगरपरिषव इमारतीसमोरची मोकळी जागा आणि आणखी काही ठिकाणे नक्की करून त्या ठिकाणी बहुमजली पार्किंग इमारती उभा करणे आवश्यक आहे. विटा वाहतूक शाखेस पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून वेऊन उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणाने करणे आवश्यक आहे.
– किरण तारळेकर, माजी उपनगराध्यक्ष
- पार्किंग समस्या सोडवणे आवश्यक
वाहनांचे पार्किंग ही शहरांमध्ये मोठी समस्या आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या वाढल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत आहे. पालिकेच्या सुधारित विकास आराखड्यामध्ये आरक्षित जागा वाहनतळासाठी ताब्यात घेणे गरजेचे आहे. तरच पार्किंगची समस्या सुटेल. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करणे गरजेचे आहे. नगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वोन्ही बाजूने वाहने पार्क केल्यामुळे रहवारीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. नवीन प्रशासकीय इमारतीच्या मागे अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडलेली वाहने पडून आहेत. त्यांचा लिलाव काढण्याची प्रक्रिया करण्याचा प्रयत्न झाला. परंतु सवर वाहने लिलावामध्ये कोणी घेत नसल्यामुळे त्यावर निर्णय नाही. त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करावी. प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेऊन ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
– संजय भिंगारवेवे, माजी उपनगराध्यक्ष.








