पूर्वी असेच घडल्याचे वाटण्याचा प्रकार
तुम्ही कुठे गेला असाल तर अचानकपणे तुम्हाला आपण येथे पूर्वीही आलो आहोत किंवा हे पूर्वीही घडले आहे असे वाटू लागते, या अनुभवालाच देजा वू म्हटले जाते. देजा वू हा फ्रेंच शब्द असून याचा अर्थ ‘पूर्वीच पाहिलेले’ असा होतो. ही अशी स्थिती असते, ज्यात आपल्याला एखादा अनुभव, घटना पूर्वी घडल्याचे वाटू लागते. या शब्दाचा वापर पहिल्यांदा 1876 मध्ये फ्रेंच तत्वज्ञ एमिल बोइराक यांनी पत्रात केला होता. लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार 80 टक्के लोकांना देजा वूचा अनुभव येत असतो. देजा वू का जाणवतो यामागे अनेक थेअरी आहेत. यामागे मेमेरी थेअरी असू शकते. यानुसार देजा वू तेव्हाच घडते, जेव्हा वर्तमान स्थिती पूर्वी घडलेल्या परंतु विस्मृतीत गेलेल्या अनुभवासमान असते. वर्तमान स्थिती अणि पूर्वी घडलेल्या अनुभवांमध्ये काही समानता असल्यास देजा वू चा अनुभव येत असतो. देजा वू या कथित समानता समजण्यासाठी आणि मानण्यासाठी आमच्या मेंदूचा प्रयत्न असू शकतो असे न्यूरोसायकाइट्रीस्ट डॉ. ओहा सुस्मिता यांनी म्हटले आहे.
देजा वू अत्यंत स्ट्राँग फीलिंग असते. ही फीलिंग कशामुळे विकसित होते हे शोधणे अत्यंत अवघड आहे. वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत देजा वू रीक्रिएट करण्यासाठी प्रयोग केला. वैज्ञानिक ऐनी क्लीरी आणि त्यांच्या टीमने यात व्हर्च्युअल रियलिटीची मदत घेतली आहे. यात सहभागी लोकांना देजा वूचा अनुभव घडविण्यासाठी त्यांच्या अनुभवांशी निगडित वातावरण तयार करण्यात आले. या अनुभवाला गेस्टाल्ट परिचित परिकल्पना (गेस्टाल्ट पॅमिलियारिटी हायपोथिसिस) नाव देण्यात आले. प्रयोगात क्लीरी आणि त्यांच्या पथकाने देजा वूला ट्रिगर करण्यासाठी सहभागी लोकांच्या अनुभवांनुसार सांगण्यात आलेल्या एका ठिकाणी फर्निचर आणि इतर सामान तसेच ठेवले, ज्याप्रकारे त्यांनी सांगितले होते. यानंतर लोकांना रीक्रिएट करण्यात आलेल्या दृश्याला नेव्हिगेट करण्यास सांगण्यात आले. हे पाहिल्यावर लोकांना देजा वूची फीलिंग आल्याचे दिसून आले. म्हणजेच जेव्हा एखादा व्यक्ती भूतकाळाशी निगडित गोष्टींना पाहतो, परंतु त्यांना आठवू शकत नाही, तेव्हा ते त्याला देजा वू युक्त फीलिंग करवितात असे वैज्ञानिकांनी सांगितले.
आणखी एक धारणा
देजा वू युक्त फीलिंग परसेप्चुअल गॅप (अवधारणात्मक अंतर) किंवा स्प्लिट परसेप्शन (विभाजित धारणा)मुळे देखील असू शकते. मेंदू एकाचवेळी एकाचप्रकारच्या सिग्नलला दोनवेळा प्रोसेस करतो तेव्हा हे घडते. पहिल्यांदा आमचे कॉन्शियस माइंड या सिग्नलवर लक्ष देऊ शकत नाही, यानंतर पुन्हा सिग्नल मिळाल्यावर देजा वू युक्त फीलिंग येते, कारण पहिला सिग्नल आठवतच नसतो.









