नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी येताच देशबरातील सर्व राजकिय पक्षाच्या नेत्यांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री म्हणून काम केलेले मुलायम सिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते.
भाजपच्या नेत्यांनी जेष्ठ राजकिय नेत्याबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दौऱ्यावर असून यादरम्यान त्यांनी माजी समाजवादी पक्ष प्रमुखांशी झालेल्या संवादाविषयी ट्विटरवर लिहून त्यांच्याशी झालेल्या भेटीचा फोटोही शेअर केला आहे. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, मुलायम सिंग यांना प्रेमाने “नेता जी” म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुलायम सिंग यांच्या भारतीय राजकारणातील योगदान सांगून “नेताजी आता आपल्यात नाहीत. समाजवादी चळवळ पुढे नेण्यात त्यांचे खुप योगदान आहे. त्यांच्या निधनाची बातमी ही खुपच दु:खदायक आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो,” अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








