श्री लईराई देवीचे सोवळे व्रत सुरू
प्रतिनिधी / वाळपई
गोव्यासह महाराष्ट्र कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेल्या शिरगाव येथील देवीची लईराईच्या जत्रोत्सवासाठी जय्यत तयारी सुरू आहे. गेल्या एक महिनाभर शाकाहार पाळणाऱ्या धेंडगणांच्या सोवळे व्रताला आजपासून सुऊवात झाली आहे. सत्तरी तालुक्याच्या अनेक तळावर धोंडगण एकत्र झाले असून त्यांनी आजपासून व्रताला सुऊवात केलेली आहे.
सर्व धोंडगण एकत्र येऊन सोवळे व्रत पाळणार असल्याने धोंडगणामध्ये उत्साह संचारलेला आहे. अलिप्त राहण्यासाठी असलेल्या जागांची साफसफाई मंडप उभारण्याचे काम धोडगणाकडून करण्यात येत आहे.
कोविड महामारीमुळे दोन वर्षे या कार्यक्रमाला मर्यादा आली होता. मात्र धोंडगणांनी एकत्रित येऊन हे व्रत पाळले होते. यंदा या व्रतासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून पाच दिवसीय हे सोवळे व्रत गुरुवारी आपापल्या ठराविक जागेवर या व्रत सुरू झाले.
व्रतस्थ धोंडगणांनी गुढीपाडवापासून शाकाहार राहण्यात सुऊवात केली आहे. आता सावळे व्रत पाळणारे धोंडगण पाच दिवस व्रत पाळणार असून पवित्र ठिकाणी मंदिर परिसरात वास्तव्यास राहणार आहेत. गुऊवारपासून धोंडगणाच्या जागा गजबजलेल्या आहेत तर शनिवारपासून सर्व धोंडगण सोहळेव्रतासाठी ऊजू होणार आहेत. या ठिकाणी अखंडपणे जत्रोत्सवापर्यंत देवीचे जयघोष आणि नामस्मरण चालणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
काही ठिकाणी महिलासुद्धा हे व्रत पाळत असतात. यामुळे पवित्र तळावर महिला व पुऊष दोन गट या पवित्र व्रताला सुऊवात करणार आहे. पुढील पाच दिवस या व्रतामुळे गावांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण होणार आहे. श्री लईराई देवीचा उत्सव प्रत्येकासाठी आनंद सोहळा असतो. हे व्रत म्हणजे एक प्रकारची धार्मिक पूजा असून शेकडो वर्षांपासून ही परंपरा जपण्याचा मान या धोरण गणांना प्राप्त झालेला आहे, असे भोम पाडेली येथील तळावर व्रत पाळणारे उदयसिंग राणे यांनी सांगितले.









