दक्षिणेतील प्रसिद्ध कलाकार वरुण तेज सध्या स्वत:च्या विवाहावरून चर्चेत आहे, तर दुसरीकडे स्वत:च्या आगामी चित्रपटावरून तो प्रकाशझोतात आहे. वरुण पुढील महिन्यात विवाहबद्ध होणार आहे. याचदरम्यान त्याने स्वत:चा चित्रपट ‘ऑपरेशन : वॅलेंटाइन’चे पोस्टर जारी केले आहे. अभिनेता या चित्रपटात वायुदलाच्या वैमानिकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर मानुषी छिल्लर यात एक रडार ऑफिसरची भूमिका साकारत आहे. हिंदी आणि तेलगूत चित्रिकरण पार पडलेला हा चित्रपट हाय-ऑक्टेन अॅक्शन दाखविणारा आहे. ‘घाबरवून-धमकावून शांती सुनिश्चित करणे हॅशहॅग ऑपरेशन वॅलेंटाइन : स्काय हाय रिविल’ असे वरुण तेजने कॅप्शनदाखल नमूद पेले आहे.
पोस्टरसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाद्वारे शक्ति प्रताप सिंह हाडा हे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहेत. या चित्रपटाची कहाणी आमिर खान आणि सिद्धार्थ राज कुमार यांच्याकडून लिहिण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती नंदकुमार अब्बिनेनी आणि गॉड ब्लेस एंटरटेन्मेंटकडून करण्यात आली आहे. वरुण तेज आणि अभिनेत्री लावण्या त्रिपाठीने चार महिन्यांपूर्वी साखरपुडा केला होता. वरुण तेज आणि लावण्या हे इटलीत विवाहबद्ध होणार आहेत. या जोडप्याच्या विवाहसोहळ्यात अनेक दिग्गज कलाकार सामील होणार आहेत. यात अल्लू अर्जुन आणि राम चरण यांचाही समावेश असणार आहे.









