ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो चित्रपट
‘तेहरान’ या चित्रपटात जॉन अब्राहमची नायिका म्हणून माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर झळकणार आहे. सम्राट पृथ्वीराज चित्रपटातील मानुषीचा अभिनय आवडल्याने निर्मात्यांनी तिची या चित्रपटाकरता निवड केली आहे. मानुषी यात ऍक्शन दृश्ये करताना दिसून येणार आहे. तिचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

तेहरान हा चित्रपट प्रदर्शित होत असताना चित्रपगृहांमध्ये मिळणारा प्रतिसाद विचारात घेत निर्णय घेतला जाणार आहे. प्रदर्शनापर्यंत स्थिती सुधारली तर तो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. अन्यथा हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित केला जाऊ शकतो.
तेहरान हा चित्रपट हेरगिरीवर बेतलेला असण्याची शक्यता आहे. याच्या कहाणीबद्दल अधिक माहिती समोर आली नसली तरीही यात जॉन अब्राहम मुख्य नायक असल्याने यात ऍक्शन दृश्यांची भरमार असणार आहे. मानुषीसाठी हा चित्रपट स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकतो.









