वृत्तसंस्था/पॅरिस
रविवार दि. 11 ऑगस्ट रोजी 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप होणार आहे. या समारोप प्रसंगी होणाऱ्या विविध देशांच्या खेळाडूंच्या पथसंचलनात भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेश आणि नेमबाज मनु भाकर हे प्रमुख ध्वजधारक म्हणून राहतील. शुक्रवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या प्रवक्त्याने ही घोषणा केली.
आयओएच्या नेतृत्वासाठी पी. आर. श्रीजेश आणि मनु भाकर यांची ध्वजधारकासाठी योग्य निवड केल्याचे अध्यक्षा पी.टी.उषाने म्हटले आहे. पी. आर. श्रीजेशची ही शेवटची स्पर्धा असून त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रातून निवृत्त होत आहे. श्रीजेशला निवृत्तीच्यावेळी भारतीय हॉकी संघातील खेळाळूंनी त्याला कास्य पदकाची भेट दिली.









