वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय निवड चाचणी रायफल आणि पिस्तुल नेणबाजी स्पर्धेत अ गटातील पाचव्या आणि सहाव्या विभागातील भारताचे ऑलिम्पिक नेमबाज मनू भाकरने तसेच ओडिशाच्या श्रीयांका सदनगी आणि मध्यप्रदेशच्या गोल्डी गुज्जरने आपले शानदार विजय नोंदविले.
महिलांच्या 25 मी. टी-6 पिस्तुल नेमबाजीत मनू भाकरने 39 गुण नोंदवित शानदार विजेतेपद मिळविले आहे. या निवड चाचणी स्पर्धेत ओडिशाच्या श्रीयांका सदनगीने महिलांच्या 10 मी. एअर रायफल टी-6 नेमबाजी प्रकारात प्रथम स्थान तर मध्यप्रदेशच्या गोल्डी गुज्जरने पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन टी-5 विभागात विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत पंजाबच्या सरतेज तिवानाने पुरुषांच्या टी-5 पिस्तुल नेमबाजीत प्रथम स्थान मिळविले. तर पंजाबच्या सिमरनप्रित कौरने महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजीचे विजेतेपद तसेच जम्मू-काश्मिरच्या अनिषा शर्माने महिलांच्या 10 मी. एअर रायफल कनिष्ठांच्या टी-6 प्रकारात विजेतेपद मिळविले आहे.









