वृत्तसंस्था/ भोपाळ
येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक पात्रता निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत सोमवारी भारताचे नेमबाज मनू भाकर आणि आदर्श सिंग यांनी अनुक्रमे महिला आणि पुरूषांच्या 25 मी. रॅपीड फायर नेमबाजी स्पर्धेत विजेतेपद मिळविले.सदर ऑलिम्पिक निवड चाचणी नेमबाजी
स्पर्धा पात्रतेसाठी महत्त्वाची आहे. सदर स्पर्धा ही चौथी ऑलिम्पिक निवड चाचणी स्पर्धा आहे. आता मंगळवारी येथे होणाऱ्या अंतिम चाचणीसाठी पुरूष आणि महिलांच्या 25 मी. रॅपीड फायर पिस्तुल नेमबाजी प्रकारातील सर्व म्हणजे 5 नेमबाज सहभागी होणार आहेत. या निवड चाचणी स्पर्धेनंतर निवड समितीची बैठक होणार असून त्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अंतिम संघाची घोषणा केली जाईल.









