संजय चंदर 31 जुलैला होणार निवृत्त/ वृत्तसंस्था
नवी दिल्ली
वरिष्ठ आयपीएस अधिकारी मनोज यादव यांची रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती कार्मिक मंत्रालयाने एका आदेशाद्वारे दिली आहे. हरियाणा कॅडरचे 1988 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले यादव हे संजय चंदर यांची जागा घेणार आहेत. चंदर हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 31 जुलै 2025 पर्यंत म्हणजेच सेवानिवृत्तीपर्यंत आरपीएफ महासंचालकपदी यादव यांच्या नियुक्तीला मंजुरी दिल्याचे आदेशात नमूद आहे. तर इंटेलिजेन्स ब्युरोमध्ये विशेष संचालक शफी अहसान रिझवी यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर सीबीआयचे संयुक्त संचालक म्हणून राजेश प्रधान यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली आहे. प्रधान हे महाराष्ट्र कॅडरचे 2003 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत.









