खासदाराने सरकारकडे केली चौकशीची मागणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राज्यसभा खासदार अन् राजद नेते मनोज झा यांनी सरकारकडे सेंटर फॉर प्रोफेशनल डेव्हलपमेंट फॉर हायर एज्युकेशनची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिल्ली विद्यापीठातील माझे व्याख्यान रद्द करण्यात आले आहे. मी या विद्यापीठाचा प्राध्यापक आहे. 4 सप्टेंबर रोजी व्याख्यान आयोजित होणार असल्याचे मला कळविण्यात आले होते. परंतु बुधवारी सकाळी एका पत्राद्वारे हे व्याख्यान रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित कार्यक्रम रद्द करण्यात आला नाही, तर केवळ माझे व्याख्यान रद्द करण्यात आले आहे. सेंटर फॉर प्रोफेशनल डेव्हलपमेंट फॉर हायर एज्युकेशनच्या (सीपीडीएचई) या पावलाची चौकशी करण्यात यावी. सीपीडीएचईच्या या कृत्यामुळे दुखावला गेलो असल्याचा दावा खासदार झा यांनी केला आहे.









