Pruthviraj Chavan On Manoj Jarange : मराठा आरक्षणावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये वाक्ययुध्द रंगलय.मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मग पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी घोडं मारलाय का? असा सवाल चव्हाण यांनी केलायं.यावर उत्तर देत असताना मराठा आरक्षण सरकट करावं अशी मागणी केल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलयं.तसंच पृथ्वीराज चव्हाण यांना समजत नाही का असा प्रतिप्रश्न जरांगे यांनी केलायं.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे.जरांगेंची शुगर, पाणीपातळी खालावतेय असं डॉक्टरांनी आज सांगितलं आहे.मात्र तपासणी करून घेण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे.सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या.तब्येत चांगली आहे, मराठा आरक्षणाच्या वेदना महत्त्वाच्या आहेत अस म्हणत सरकारसमोरचं आव्हान अधिक तीव्र करण्याची भूमिका जरांगे यांनी घेत
पाणी घेणं बंद केलं आहे.
यावेऴी बोलताना जरांगे म्हणाले,मराठा समाजानं 70 वर्ष सर्व नेत्यांना भरभरून दिलं.आता सरकारनं सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.पृथ्वीराज चव्हाण यांना प्रत्यूत्तर देताना जरांगे म्हणाले,तुमच्याकडे निजाम आला होता का नव्हता मला माहित नाही.निजामाला 15 दिवस घेऊन जायच मगं, काहीही बोलतात उगाचं. आम्ही घोडलं मारलयं का तुमचं, असाही सवाल जरांगे यांनी केलं.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण
पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजानं घोडं मारलयं का? त्यांनाही आरक्षण मिळावं अस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलयं.शाहू महाराजांच्या काळातील पुरावेही ग्राह्य धरावेत अशी मागणी सरकारकडे केल्याचेही त्यांनी म्हटलयं.
मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण दिलीयं मग पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने काय घोडं मारलयं, असा आक्षेप घेत निजामकालीन पुरावे ग्राह्य धरले जात आहेत. मग शाहू महाराजांच्या काळातील पुरावेही ग्राह्य धरत नाही हा कोणता नाय आहे, असा सवालही त्यांनी केलायं.