ओटवणे / प्रतिनिधी
Manohar Gawkar of Ottawane Bhatwadi passed away!
ओटवणे भटवाडी येथील मनोहर गंगाराम गावकर (६६) याचे शनिवारी १५ एप्रिल रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. सुरवातीला मुंबईत इंजेक्शन मोल्डींग मशीनवर ऑपरेटर म्हणून ते कामाला होते. त्यावेळी मशीनवर हाताची बोटे तुटल्यानंतर ते वीस वर्षापासून गावीच होते. गेले वर्षभर ते आजारी होते. रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील भालचंद्र ऊर्फ बाळा गावकर यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, चार बहिणी, भावोजी असा परिवार आहे.









