नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 77 व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. भारतावर कोरोनाचे भयानक संकट आलेलं असताना देशातील जनतेनी धैर्य दाखवलं, गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठ्या महामारी विरोधात संपूर्ण देश पूर्ण ताकतीने लढतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या महामारीमुळे आलेल्या अनेक संकटांना देशाने यशस्वीपणे तोंड दिलंय. या दरम्यान चक्रीवादळ तसंच अनेक ठिकाणी भूकंप आणि नैसर्गित आपत्ती आल्या. त्यांचाही देशाने चिकाटीने मुकाबला केला. तसेच देशात सगळीकडे कोरोनाने थैमान घातले असताना सरकारने ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करत असून, दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर ऑक्सिजनमुळे प्रचंड हाहाकार उडाला होता. देशात सगळीकडे कोरोना वाढला असताना ऑक्सिजन सरकारने पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात आला. देशातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला असून, यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या ऑक्सिजन वॉरियर्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.
या कोरोना काळात ज्या राज्यांत चक्रीवादळ आले त्या राज्यांतील लोकांनी ज्या प्रकारचे धाडल दाखवलं ते कौतुकास्पद आहे. या संकटाच्या समयी त्यांनी मोठ्या धैर्याचं दर्शन दाखवलं. राज्य शासन आणि प्रशासन दोघांनीही एकजुट होऊन या आपत्तीचा सामना केल्याचे देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.









