Mann Ki Baat 100th Episode : ‘मन की बात’ या रेडिओ एपिसोडचा आज 100 वा भाग प्रसारीत झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील श्रोत्यांचे आभार मानले. आज मोदींना हजारो पत्रे, लाखो मेसेज पाठवण्यात आले. या पत्रांना पाहून नरेंद्र मोदी भाऊक झाल्य़ाचे मोदींनी सांगितले. जास्तीत जास्त पत्र वाचण्याचा तसेच संदेश समजून घेण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचेही म्हटले.तुम्ही मला शुभेच्छा दिला आहात. मात्र हे सर्व श्रेय मन की बात ऐकणाऱ्या श्रोत्यांचे आहे. मन की बात ही भारतातील कोट्यावधी लोकांच्या मनातील असल्य़ाचे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.
या कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, 3 ऑक्टोबर 2014 हा विजया दशमीचा सण होता आणि आपण सर्वांनी मिळून विजया दशमीच्या दिवशी ‘मन की बात’चा प्रवास सुरू केला. विजया दशमी म्हणजेच, वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण, ‘मन की बात’ हा देखील देशवासियांच्या चांगल्या सकारात्मकतेचा अनोखा सण बनला आहे. असाच एक सण, जो दर महिन्याला येतो, ज्याची आपण सगळे वाट पाहत असतो.अशी आठवण नरेंद्र मोदी यांनी सांगितली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









