आता झेड श्रेणी सुरक्षा कवच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने माजी पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. गुरशरण कौर यांना आता झेड श्रेणीची सुरक्षा मिळणार आहे. सुधारित निर्णयानुसार त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेव्यतिरिक्त निवासाच्या सुरक्षेसाठी सुमारे 12 सशस्त्र कमांडोंचे संरक्षण मिळेल. त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर आता सशस्त्र सुरक्षा कमी केली आहे. यापूर्वी त्यांना झेड-प्लस श्रेणीची केंद्रीय सुरक्षा देण्यात आली होती. केंद्रीय गुप्तचर संस्थांनी गुरशरण कौर यांच्या सुरक्षेचा अलिकडेच आढावा घेतला. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या व्हीआयपी सुरक्षा शाखेला त्यांचे प्रोटोकॉल कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.









