म्हापसा येथे भावभक्ती संगीत स्वर अभिषेकी संमेलनाचे पहिले सत्र
पणजी : स्व. दत्ताराम पालयेकर चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार यांच्या सहकार्याने आयोजित 14 व्या भावभक्ती संगीत स्वर अभिषेकी संमेलनाचे पहिले सत्रात रविवारी सकाळी पार पडले. यावेळी गंधर्व अभिषेकी कार्यक्रमांतर्गत सकाळच्या सत्रात मंजुषा पाटील व आनंद भाटे यांनी एका पेक्षा एक अशी गीते सादर करून रसिकांना रिझविले.
डॉ. अजय वैद्य यांचे सूत्रनिवेदन तसेच दयानिधेश कोसंबे यांच्या तबल्याचा ठेका व राया कोरगावकर यांच्या संवादिनी साथीने गंधर्व अभिषेक सत्राला चांगलीच साज चढली. आनंद भाटे यांनी गायिलेल्या ‘झाले युक्ती मना’ तसेच बाल गंधर्वांनी गायिलेला ल नंतर भिमसेन जोशी यांनी जगप्रसिद्ध केलेले ‘कानोबा तुझी माऊली’ हा ज्ञानोबा माऊलींचा अभंग सादर करून प्रेक्षकातून वन्स मोअरची दाद मिळविली. त्यानंतर मंजुषा पाटील कुलकर्णी यांनी पतीत तू पावना, आनंद भाटे यांचे बोलू ऐसे बोल, अगा पुंडलिक वरदान अशा एका पेक्षा एक अशा दोघांनी एकत्रित गायिलेल्या गीतांचा रसिकांनी आनंद लुटला. प्रथम स्वर अभिषेकीचे प्रमुख विनोद पालयेकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.









