नवी दिल्ली :
दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात कैद माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पत्नी सीमा यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. सीमा सिसोदिया यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या मल्टीपल स्केलेरोसिस या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. यापूर्वी 25 एप्रिल रोजी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.









