वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाकडून बहुचर्चित मद्य घोटाळ्यासंबंधी सीबीआय आणि ईडी या दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांना जामीन नाकारण्यात आला होता. या निर्णयाला सिसोदिया यांनी सर्वोच्च आव्हान दिले आहे. सिसोदिया यांनी यापूर्वी सत्र न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयात बऱ्याचदा जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, तपास यंत्रणांच्या विरोधामुळे दोन्ही न्यायालयांकडून त्यांचा अर्ज वारंवार फेटाळला जात आहे. दुसरीकडे, मनीष सिसोदिया यांना गुऊवारी राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.









