वृत्तसंस्था/ मंड्या
येथे सुरू असलेल्या आयटीएफ मंड्या खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या मनिष गणेश आणि सिद्धार्थ विश्वकर्मा यांनी पुरूष एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
मनिष गणेशने निरज यशपालचा 6-1, 6-1 तर विश्वकर्माने आदिल कल्याणपूरचा 6-3, 6-1 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. पुरूष दुहेरीत कर्नाटकाचा एस. डी. प्रज्वल देवला पुरूष दुहेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.









