वृत्तसंस्था/ हुबळी
2024 च्या रणजी हंगामातील येथे सुरू असलेल्या सामन्यात मनिष पांडेच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर कर्नाटकाने शनिवारी दिवसअखेर पहिल्या डावात 3 बाद 268 धावा जमवित चंदीगडवर केवळ एका धावेची नाममात्र आघाडी मिळविली. या सामन्यात चंदीगडचा पहिला डाव 267 धावात आटोपला होता.
चंदीगडच्या पहिल्या डावात करण कैलाने 79 धावांचे योगदान दिले. कर्नाटकातर्फे हार्दिक राज आणि विजयकुमार विशाख यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले. कर्नाटकाच्या पहिल्या डावात मनिष पांडे 102 धावांवर खेळत असून मयांक अगरवालने 57 धावा जमविल्या.









