Manipur violence On Jayant Patil : संसदेचे पावसाळी अधिवेशन गेल्या गुरुवारी सुरु झाले. हा अधिवेशनाचा दुसरा आठवडा आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याही विषयांवर दोन्ही सभागृहात चर्चा झालेली नाही. विरोधकांनी मणिपूरच्या मुद्यांवर मागे हटण्यास नकार दिला आहे. पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: मणिपूससंबधी निवेदन दिले पाहिजे असा आग्रह धरला विरोधकांनी धरला आहे. याचा परिणाम संसदेतील विधयकांवर झाला आहे. दरम्यान आज मणिपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यव्यापी निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मणिपूर आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
सामान्य माणसाला मणिपुरात असुरक्षित वाटतयं. देशाची जनता संतप्त झाली आहे. सरकारने ही धगधग आर्मी आणून शांत करायला हवी होती. दोन जमातीतील ताणतणाव कमी होणे गरजेचं आहे. महिला सुरक्षित नाहीत. मोठ्या प्रमाणात हत्य़ा होत आहेत. मणिपूर सरकारने आर्मी आणून मणिपूर शांत करायला हवं होतं.मात्र केंद्र आणि मणिपूर सरकार काहीच करत नाही पाहिजे.मणिपूरबद्दल केंद्र सरकार गंभीर नाही.केंद्र सरकार लष्कर का पाठवत नाही? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला. आज राष्ट्रवादीने मौन व्रत धारन करून राज्यव्यापी आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी याचे प्रतिनिधित्व करत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, मणिपूरसंदर्भात सदनामध्ये आपचे खासदार संजयसिंह यांनी मागणी केल्याने त्यांच निलंबन करण्यात आलं. विरोधी पक्षाला संसदेत बोलू दिलं जात नाही. यासारख दुर्देव नाही अशी टीका सरकारवर जयंत पाटील यांनी केली.








