‘मिशा बजाज’मध्ये सर्व सुविधा उपलब्ध : 113 वर्षांपासून व्यवसाय
बेळगाव : माणिकबाग ग्रुपचे नवे बजाज शोरुम ‘मिशा बजाज’ नावाने सुरू होत आहे. मिरजी आणि शहा असोसिएटच्या माध्यमातून हे नवीन शोरुम सुरू होणार आहे. जे. पी. टॉवर्स, जुना धारवाड रोड, सुभाषनगर येथे मिशा बजाजचे नवीन शोरुम असणार आहे, अशी माहिती माणिकबाग ग्रुपच्यावतीने देण्यात आली. धारवाड रोड येथे वर्कशॉपची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 3500 चौरस फुटांचे भव्य शोरुम ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर 4500 चौरस फुटांचे वर्कशॉप सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व सुविधा एकाच छताखाली ग्राहकांना मिळणार आहेत. 113 वर्षांपासून माणिकबाग ग्रुपच्यावतीने सुरू असलेल्या व्यवसायाची माहिती माणिकबागचे संचालक भूषण मिरजी यांनी दिली. यावेळी संचालक शील मिरजी, संचालक स्वप्निल शहा, पार्टनर सौरभ शहा, मार्केटिंग विभागाचे जनरल मॅनेजर शैलेश खटावकर यासह इतर सदस्य उपस्थित होते.









