वृत्तसंस्था/ दोहा
भारताची मिश्र दुहेरीची जोडी जी. साथियान व मनिका बात्रा यांनी येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीटी कंटेन्डर टेटे स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
मनिका-साथियान यांनी इंग्लंडच्या टिन टिन हो व सॅम्युअल वॉकर यांच्यावर 6-11, 11-8, 8-11, 11-7, 11-8 असा 3-2 फरकाने संघर्षपूर्ण विजय मिळविला. गेल्या नोव्हेंबरमध्ये स्लोव्हेनियात झालेल्या डब्ल्यूटीटी कंटेन्डर नोव्हा गार्सिया स्पर्धेत भारतीय जोडीने रौप्यपदक मिळविले होते. त्यांची पुढील लढत स्पेनच्या मारिया झियाओ व अल्वारो रॉबल्स यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत अनुभवी अचंता शरथ कमलने दुसरी फेरी गाठताना तैपेईच्या चुआंग चिह युआनवर 11-8, 11-9, 11-8 असा सहज विजय मिळविला.









