वृत्तसंस्था/ लुबलिजेना
येथे सुरु असलेल्या विश्व टेबल टेनिस स्पर्धेत भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राला उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हार पत्करावी लागली. रुमानियाच्या झोसेसने मनिका बात्राचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
या स्पर्धेत मनिका बात्राने पहिल्या फेरीतील सामन्यात 15 व्या मानांकित चेन चिंगचा पराभव केला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात बात्राला झोसेसकडून 4-11, 11-9, 7-11, 11-9, 8-11 असा पराभव पत्करावा लागला. मनिका बात्रा सध्या महिला टेबल टेनिसपटूंच्या जागतिक मानांकन यादीत 36 व्या स्थानावर आहे.









