मंत्री उदय सामंत यांची माहिती : लॉजिस्टिक पार्पला तत्वत: मान्यता : कोकणातील बागायतदारांना होणार फायदा
प्रतिनिधी/रत्नागिरी
कोकणात लॉजिस्टिक पार्प उभारण्यासाठी राज्य शासनाकडून तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. या पार्पच्या माध्यमातून रत्नागिरीमधील जयगड बंदरातून आंबा, काजू व मत्स्य निर्यात करण्यात येणार आहे. याचा मोठा फायदा अडचणींचा सामना कराव्या लागणाऱ्या कोकणातील आंबा, काजू बागायतदार व मच्छीमारांना होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेले मंत्री सामंत यांनी रविवारी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली. यानंतर श्री रत्नागिरीचा राजा येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी लॉजिस्टिक पार्पसंबंधी माहिती दिली. लॉजिस्टिक पार्प उभारण्यासंबंधी नुकतीच आपली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार रत्नागिरीत मँगो पार्प, काजू पार्प व मरिन पार्प उभारण्यात येणार आहे.
वाटद-खंडाळा एमआयडीसी उभारण्यासाठीही आपण पयत्नशील आहोत. मात्र यासाठी शेतीयोग्य जमीन घेणार नसून कातळ जमीन स्थानिक देण्यास तयार असतील तर एमआयडीसीसाठी पुढाकार घेण्यात येईल. राज्यात 25 हजार उद्योजक तयार करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. तसेच कोकणातील स्थानिक तरूणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सामंत म्हणाले. स्टरलाईट जागेवर लवकरच नवा उद्योग स्टरलाईट कंपनीच्या जागेवर उद्योग सुरू करण्यासंबंधी जागा ताब्यात असलेले अनिल अगरवाल यांच्याशी आपली चर्चा सुरू आहे. लवकरच यासंबंधी तोडगा काढण्यात येईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. राज्याच्या एमआयडीसीत आजारी उद्योगांची संख्या मोठी आहे. या उद्योगांना पूर्वपदावर
आणण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. कोकणात प्रदुषणविरहित कारखाने आले पाहिजेत, ही आपली भूमिका असल्याचे ते म्हणाले.
रिफायनरीसाठी स्थानिक आमदारांचे मत महत्वाचे रिफायनरीसंबंधी खासदार विनायक राऊत व स्थानिक आमदार राजन साळवी यांचे एकमत नसल्याचे दिसून येत नाह़ी स्थानिक आमदार हे जनतेशी अधिक जवळ असतात. आमदार हे खासदारांना निवडून देण्यासाठी काम करतात. त्यामुळे राजन साळवी यांनी रिफायनरीला दिलेला पाठिंबा अधिक महत्वाचा असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.
आमदार भास्कर जाधवांना नेतेपदासाठी शुभेच्छा
आमदार राजन साळवी यांना उपनेतेपद व आमदार भास्कर जाधव यांना नेतेपद देण्यात आले आहे. याविषयी बोलताना सामंत म्हणाले की, कुणाला कोणते पदद्यावे, हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्याकडून आमदार भास्कर जाधव यांना नेतेपदासाठी शुभेच्छा आहेत. नगर परिषदेला जाग आणण्यासाठी नाट्यगृहाची वीज तोडली. नुकतेच महावितरणकडून रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृहाची वीज तोडण्यात आली होती. याविषयी बोलताना सामंत म्हणाले की, नगर परिषदेचे अधिकारी जागे आहेत की नाही, हे पाहण्यासाठी ही वीज तोडण्यात आली होती.









