प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण झाल्याचे दिसून येत आह़े त्याचप्रमाणे उष्णतेतही कमालीची वाढ झाली आह़े नुकतेच आंब्याच्या झाडांना पालवी फुटली असतानाच बदललेल्या वातावरणाचा फटका आंबा कलमांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आह़े त्यामुळे जिह्यातील आंबा बागायतदार हे चिंतेत पडले आहेत़
दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस थंडी पडण्यास सुरूवात झाली होत़ी याची दखल घेत बागायतदारांनी फवारणी करण्यास सुरूवातही केली होत़ी मात्र अचानक वातावरणात बदल झाल्याचे दिसत आह़े मागील 3 ते 4 दिवसांपासून थंडी गायब होवून उष्णतेची लाट आल्याचे जाणवू लागली आह़े त्यातच ढगाळ वातावरण पसरले असून पावसाची शक्यताही वर्तवण्यात येत आह़े जिह्याच्या काही भागात हलक्या स्वरूपात पावसाच्या सरीही पडल्या.
मेहनतीवर पाणी फेरले जाण्याची भीती
सर्वत्र मंदीचे सावट असताना आंबा बागायतदारांनी यावर्षी चांगले फळ येण्याची आस लावली होत़ी नोव्हेंबर महिन्यात समाधानकारक थंडी पडल्याने आंब्याच्या झाडांचा पालवी फुटली होत़ी त्यामुळे बागेची साफसफाई व इतर कामांनी वेग पकडला होत़ा मात्र आता ढगाळ वातावरण असल्याने केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले जाण्याची भीती बागायतदारांना वाटत आह़े









