Mango Curry Recipe : कढी म्हटलं की ताकाची हळद घातलेली किंवा पांढरी कढी आपल्याला माहित असते. गरम-गरम भातासोबत किंवा जेवताना मध्ये-मध्ये एक घोट कढी(याला करीही म्हणतात) जेवणाची लज्जतच वाढवते. कढी पिणे आवडत नाही असे म्हणणारे हाताच्या बोटावरचं. मात्र ही कढी जादा थंडीच्या दिवसात आपण पिणे पसंद करतो. उन्हाळ्यात फार कमी प्रमाणात घरी कढी बनवली जाते. कारण उन्हाळ्यात ताक, दही, आंबील जेवणात असते. मात्र या कढीची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही जेवणात आंब्याची कढीचा पर्याय निवडू शकता.आंब्याची कढी कशी बनू शकते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र या रेसीपीसाठी कागलच्या गायत्री देशपांडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी त्यांची खास रेसीपी तरुण भारत संवाद सोशल मिडियासाच्या वाचकांसाठी शेअर केली आहे. चला तर मग आंब्यापासून नेमकी कढी कशी बनवावी याची रेसीपी जाणून घेऊया.
साहित्य
कच्चा आंबा-1
ओल खोबर- एक वाटी
लसूण- 10 ते 12 पाकळ्या
मिरची- तीन
कोथिंबीर – पाच पाकळ्या
कडीपत्ता- 2 डहाळे
हळद- छोटा 1 चमचा
मोहरी – पाव चमचा
हिंग – अर्धा चमचा
जिरे-अर्धा चमचा
तेल- 2 चमचे
साखर- 4 चमचे
मीठ- चवीनुसार
कृती
सरूवातीला आंब्याची साल काढून घ्या.यानंतर आंब्याचे पातळ काप करून घ्या.आता नारळ खवणून घेऊन त्यात मिरची,लसूण,थोडी हळद मिक्स करून घ्या. हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्या.आता गॅसवर छोटा पॅन ठेवा. यात तेल घाला, तेल गरम झाले की मोहरी, जिरे, लसणाची फोडणी करून घ्या. यानंतर ही फोडणी मिश्रणात मिक्स करून लागेल तेवढे पाणी घाला. वरून साखर,मीठ,कोथिंबीर घालून या कढीला एक उकळी येवू द्या. एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.झाली तयार आंबा कढी. तुम्ही ही गरम-गरम सर्व्ह करा.ताकाच्या कडीप्रमाणे तुम्ही कढी पिऊ शकता. तुमच्या तोंडाला चव तर येईलच शिवाय आंब्याचा एक नवीन पदार्थ शिकायला मिळाला याचा आनंद होईल.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









