मंडणगड :
कोन्हवली गाव परिसरात शुक्रवारी लागलेल्या वणव्यात पाच एकर क्षेत्रात मोहरलेली व फळधारणा झालेली आंबा, काजूची बाग जळून खाक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
वणवा लागल्यानंतर आग भडकत गेल्याने सुमारे ५ एकर क्षेत्रातील वंदना तांबे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची आंबा व काजूची फळझाडे जळून खाक झाली. एप्रिल व मे महिना हा आंबा-काजूच्या उत्पादनाचा काळ असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तलाठ्यांकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. तरी नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी होत आहे.








