उपाध्यक्षपदी रोशन तळावडेकर, सचिवपदी रुपेश नाटेकर तर खजिनदारपदी एलियास राजगुरू
ओटवणे | प्रतिनिधी
माजगाव नाला सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी माजगाव माजी सरपंच मंगेश राठवड, उपाध्यक्षपदी रोशन तळावडेकर, राजू कुबल, सचिव पदी रुपेश नाटेकर, सह सचिवपदी राजेश हरमलकर तर खजिनदारपदी एलियास राजगुरू यांची निवड करण्यात आली. माजगाव नाला सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या शनिवारी रात्री झालेल्या नियोजन बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीत या सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या सदस्यपदी दिनेश सावंत, सुनिल सागवेकर, बंटी कासार, संजय माजगावकर, प्रशांत बुराण, सचिन कासार, वैभव मोर्ये, सचिन मोरजकर, शुभम कुबल, रणवीर सूर्यवंशी, राजन पाटकर, संजू बोंद्रे, अशोक पाटकर यांची निवड करण्यात आली.नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार २२ सप्टेंबर पासून दररोज सायंकाळी भजन, दशावतार नाट्य मंडळाचे नाटक, जादूचे प्रयोग आदी कार्यक्रम, पपेट शो, स्थानिक मुलांचे कार्यक्रम, महिलांची फुगडी, बहारदार, तसेच डबलबारी आदी विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच दहाव्या दिवशी बुधवारी १ ऑक्टोंबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.









