सदोदीत लोकजागृतीसाठी कार्यरत राहण्याचा दिला मंत्र
वार्ताहर / माशेल
आर्थिक सल्लागार मंगेश गावकर यांनी संपादित केलेले कोविड वॉरियर्सना समर्पित कॅलेंडर (दिनदर्शिका) नुकतेच राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन त्याना प्रदान करण्यात आले. कोविड काळात डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलीसांच्या अथक पयत्नामुळे कोराना गोव्यात नियंत्रणात आल्याने मंगेश गावकर यांनी ही आपल्यापरिने मानवंदना दिलेली आहे. मंगेश गावकर यांच्या या उपक्रमाचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी खास कौतुक केले आहे.
मंगेश गावकर यांनी कोविड वॉरिअर्सचा गौरव करण्यासाठी कॅलेडरची संकल्पना अंमलात आणली आहे. राज्यपालांच्या भेटीत मंगेश गावकर यांच्या पत्नी अॅड. विधीता शेट्यो गावकर उपस्थित होत्या. मंगेश गावकर यांनी आपल्या कॅलेंडरविषयी माहिती कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर कोविड नियंत्रणात सहभागी झालेल्या विविध विभागाचे एक छायाचित्र, त्यामध्ये त्याच्याद्वारे केलेल्या कार्याची संक्षिप्त माहितीसह कॅलेंडर तयार केलेले आहे. डॉ. शेखर साळकर, गौरेश धेंड यांच्यासारख्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे प्रकाशन झाले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी त्या कॅलेंडरची प्रती घेऊन केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांना पोहोचविल्या आणि त्यांनीही या कॅलेंडरवचे कौतुक केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत.
गोव्यात कॅलेंडर सोबत वराह अवतारातील श्रीविष्णू आणि त्याच्यासमोर वॉरिअर्स असे एक चित्र गोव्यातील युवा चित्रकार हर्ष कुंडईकर यांनी साकारले आहे. हे चित्रही आपण राज्यपालांना प्रदान करण्यात आले. चित्र राजभवनात आर्ट गॅलरीतमध्ये राज्यपालांनी ठेवले. वेगळा संकल्प घेऊन लोकांमध्ये जागृती करण्याची सुचना यावेळी राज्यपालांनी मंगेश याला केली. आपण गोव्यातील ‘हेरीटेज’ या विषयावर पुस्तक लिहीत असून गोव्यातील जी वारसा झाडे आहेत त्या झाडांची माहिती घेऊन त्यावर आपण पुस्तक लिहणार असल्याचे राज्यपालांनी आपल्या भेटीत सांगितले.









