दोडामार्ग – तेजस देसाई
▪️आज सायंकाळी दोडामार्गमध्ये जल्लोषात होणार स्वागत
मांगेली (ता. दोडामार्ग) येथील सुपुत्र रोहित कृष्णा गवस (वय २१) यानी भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्याचे बाळगलेले स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. एस. एस. बी. इलाहाबाद मधून घवघवीत यश त्यांनी मिळवले असून ओटीए चेन्नई येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळणार आहे. ग्रामीण भागातील मुल सुद्धा शासकीय सेवेत अधिकारी व्हावीत ही प्रेरणा मिळण्यासाठी रोहित आज गावी येत असताना दोडामार्गमध्ये त्याचे जल्लोषी स्वागत केले जाणार असल्याचे रोहितचे वडील कॅप्टन कृष्णा गवस यांनी सांगितले.









