सातारा :
झेडपी चौक ते कनिष्क हॉल मार्गान पायी चालत निघालेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञाताने हिसकावले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवार ३ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उषा बापूसाहेब जाधव (वय ६०, रा. सदरबझार, सातारा) या झेडपी चौक ते कनिष्क हॉल मार्गे चालत निघाल्या होत्या. यावेळी दोन अनोळखी इसमांनी धूमस्टाईलने त्यांच्या गळ्यातील दीड लाख किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यांनी शहर पोलिसांत ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक केणेकर करत आहेत.








